नंदूरबार तालुक्यातील केंद्रशाळा शिंदे येथे शिक्षण परिषदेत दादाभाई सरोदे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न.
नंदूरबार दि.३० नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा पातोंडे शाळेचे शिक्षक श्री.दादाभाई लोटन सरोदे हे नियत वयोमानाने दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने शिंदे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी दादाभाई सरोदे सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ जि.प.केंद्र शाळा शिंदे येथे शिक्षण परिषदेमध्ये घडवून आणला. सदरील सेवापूर्ती सोहळ्याला केंद्रप्रमुख श्री.सुरेश भगवान वानखेडे यांच्या कल्पनेतून प्रत्येक शिक्षण परिषदेला केंद्रातून एका शिक्षकाची अध्यक्ष म्हणुन निवड करून त्यांना सन्मानित करावे याच प्रेरणेतून आजच्या शिक्षण परिषदेला जिल्हा परिषद शाळा वरूळ येथिल मुख्याध्यापक श्री.अनिल शिवाजी माळी सर याना अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख उपस्थिती श्री.जयंत अमृत चौरे साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स. नंदुरबार, श्री.दिनेश वसावे साहेब माजी व निवृत्त गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख श्री सुरेश भगवान वानखेडे ,श्री. करण भील प. स. सदस्य.नंदुरबार, श्री. संजू भील शां. व्य. समिती अध्यक्ष. श्रीम. शारदा सोनवणे मॅडम, पदोन्नती मुख्याध्यापक कोळदे, , केंद्रशाळा मुख्याध्यापक श्री.मोतीराम वसावे सर, सत्कार मूर्ती श्री. दादभाई लोटण सरोदे व त्यांच्या पत्नी उपस्थित होते.
सुरवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्री.संतोष एकलहरे सर यांच्या मुलगा विवेक याने पियानो वर केशवा माधवा हे गीत वादन करून कार्यक्रमची सुरवात केली. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.नवोदय मध्ये निवड झालेल्या नयन या विद्यार्थ्यांचा पालकांनी श्री. एकलहरे सर यांचे आभार मानले.नंतर श्री. एकलाहरे सर यांनी कार्यक्रमांचे प्रस्ताविक केले.
सुरवातीला दादाभाई सरोदे यांच्या जीवनकार्याचा परिचय केंद्रातील श्री. उमेश बेडसे सर यांनी सर्वांना करून दिला. केंद्रातील सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते श्री. दादाभाई यांचा सहकुटुंब सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. पाटोंडे शाळेतील दादाभाई सरोदे यांच्या महिला सहकारी भगिनी यांनी देखील शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री.सुरेश भगवान वानखेडे सर यांनी दादाभाई यांच्या कामाबद्दलचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. माजी गटशिक्षणाधिकारी श्री दिनेश वसावे साहेब यानी आपले मनोगत व्यक्त केलं. श्री.अनिल माळी सर, श्रीम.मीनाक्षी सिरसाठ मॅडम, श्रीम. वसावे मॅडम, श्रीम.शितल पाटील मॅडम आदी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तदनंतर निरोपर्थी श्री दादाभाई सरोदे यांनी आपल्या मनोगतातून शिंदे केंद्रांत काम करताना आलेले गोड अनुभव व्यक्त केले. अनुभव व्यक्त करत असताना सराना आपले अश्रु अनावर होउन ते भाऊक झाले. यापुढे आपल्या शिक्षक बधुंचा सहवास लाभणार नाही या गोष्टीने ते भाऊक झाले.
नेहमी शिक्षकांच्या अडचणींत त्यांना मदत करणे, शाळा व्यवस्थित सांभाळणे हे कौशल्य शिक्षक म्हणून सहज पार पाडणारे दादाभाई सरोदे यांच्या निवृत्त होण्याने नक्कीच शिक्षण क्षेत्रात एक चांगल्या शिक्षकाची कमतरता जाणवेल.” असे सर्व मान्यवर व्यक्त झाले. तर दादाभाई यांच्या कुटुंबांनी त्यांच्या सेपापुर्तीचा आनंदाने स्वीकार करत आनंद व्यक्त केला. सेवापूर्ती सोहळ्यासाठी सर्व उपस्थितांना भोजनाची सोय करणारे जि.प.शाळा शिंदेचे मुख्याध्यापक मोतीराम वसावे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी छान सोय केली. श्री.योगेश हुरेज यांनी फलकलेखन करून सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कठोरे दिगरचे मुख्याध्यापक श्री.उमेश बेडसे सर यांनी अपल्या अनोख्या भाषा शैलीमध्ये केले. श्री एकलहरे सर,श्री. नामदेव पाटिल सर, श्री. अरुण पवार सर श्रीमती पवार मॅडम यांनी कर्यकमासाठी मेहनत घेतली. श्री.रमेश पावरा सर यांनी फोटोग्राफी केली तर श्री. प्रफुल्ल गोसावी सर यांनी वंदे मातरम् घेऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार