कुडावळे आदिवासीवाडीत सौर ऊर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना सुरू करा -सुशिलकुमार पावरा

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी

रत्नागिरी:- कुडावळे आदिवासीवाडीत सौर ऊर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना सुरू करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने आर. एम. दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली व आनंदे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग कार्यालय दापोली यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, महाराष्ट्र राज्य महिला जिल्हाध्यक्षा रत्नागिरी  चंद्रभागा पवार, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार आदि आदिवासी बांधव उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण जिल्हा रायगड यांना सरपंच ग्रामपंचायत कुडावळे यांनी दि. १ नोव्हें. २०२१ रोजी पाणी पुरवठा योजना सुरू करणेबाबत विनंती अर्ज केला होता. तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली जिल्हा रत्नागिरी यांना सरपंच ग्रामपंचायत कुडावळे यांनी दिनांक १२ ऑक्टो. २०२१ रोजी पाणीपुरवठा योजना सुरू करणेबाबत विनंती अर्ज केला होता.


कुडावळे आदिवासी वाडीतील पाण्याची समस्या लक्षात घेऊन कुडावळे आदिवासीवाडी येथे सौर ऊर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे. 



आदिवासी युवा आता YouTube  वरही उपलब्ध🙏 चॅनेल आत्ताच SUBSCRIBE करा👍

https://youtube.com/channel/UC3dk-NqPkDV3CHV8a-J-OSA

Post a Comment

0 Comments

झाले