प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलची रक्कम तीन लाख पन्नास हजार रु. पर्यंत वाढवून मिळावी -बिरसा क्रांती दलाची मागणी.



✍मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

पुणे जिल्हा:- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाची रक्कम ही सद्यस्थिती पाहता फारच कमी आहे. ही घरकुलची रक्कम तीन लाख पन्नास हजार रुपये इतकी वाढवून द्यावी. अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेचे राज्य सचिव आदि. चिंधू आढळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन  निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, सध्या महागाई ही फारच मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रत्येक वस्तूचे व जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे गगनाला भिडले आहेत. या भाववाढीमध्ये सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके बसत असून त्यांना ही भाववाढ कधीही न परवडणारी आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वतःच्या हक्काच्या घरात राहता याव. त्यांना सुध्दा राहण्यासाठी एक निवारा मिळावा. याकरिता भारत सरकार कडून पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व इतर घरकुल योजना राबविण्यात येतात. 


सध्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र या योजनेसाठी शासनाकडून मिळणारा निधी रक्कम अत्यंत कमी असून ती एक लाख वीस हजार रुपये आहे त्या रकमेमध्ये वाढती महागाई लक्षात घेता कुठल्याही प्रकारे घराचे बांधकाम पूर्ण होत नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये सिमेंट,  विटा, वाळू, लोखंड गज, मजुरी तसेच मिस्त्रीची मजुरी इत्यादींचे भाव प्रचंड वाढले आहेत. या प्रचंड वाढत्या महागाईमुळे तो लाभार्थी आपले घर शासनाच्या एवढया कमी अनुदानात बांधू शकत नाही. त्यामुळे त्या अनुदानाची रक्कम तीन लाख पन्नास हजार एवढी करण्यात यावी.


अशी मागणी मुख्यमंत्री, पंतप्रधान, यांच्याकडे ऑनलाईन निवेदनात बिरसा क्रांती दल संघटनेचे राज्य सचिव, आदि. चिंधू आढळ यांनी केली आहे.


आदिवासी युवा आता YouTube  वरही उपलब्ध🙏 चॅनेल आत्ताच SUBSCRIBE करा👍

https://youtube.com/channel/UC3dk-NqPkDV3CHV8a-J-OSA

Post a Comment

0 Comments

झाले