नंदुरबार दि.१४(प्रतिनिधी ) महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या A2s11 ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) युवारंग फाउंडेशन आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज दि.१४ एप्रिल २०२२ रोजी मिशन हायस्कूल नंदुरबार ( Mission High school Nandurbar ) येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष- व्ही. आर. पवार उपमुख्याध्यापक एस.ए.मिशन हायस्कुल प्रमुख अतिथी- मा.महेश माळी API शहर पोलीस स्टेशन, मा. प्रविण पाटील PSI शहर पोलीस स्टेशन, मा.राठोड सर, चंद्रशेखर चौधरी, युवारंग फाउंडेशनचे ( YuvaRang Foundation ) अध्यक्ष जितेंद्र लुळे, सचिव राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, भावेश मंडलिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले तर आभार जिेतेंद्र लुळे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. नुतनवर्षा वळवी, युवराज भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नाविण्यपूर्ण प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आईस्क्रीम वाटप करण्यात आले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार