अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.






✍गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर








नंंदुुरबार दि.१९... अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर जि.प.शाळेत येथे सरस्वती मातेचे पूजन, दिपप्रज्वलन, अध्यक्ष निवड, मान्यवरांचे स्वागत, सत्कार, जनजागृती फेरी, प्रवेशपात्र बालकांची क्षमता चाचणी, प्रथमतः मान्यवरांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरील फित कापून मेळाव्याचे उद्घाटन केले. त्यांनतर सर्व उपस्थित मान्यवरांनी सरस्वती मातेचे पूजन केले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.पुष्पाताई सैंदाने (माजी जि. प. सदस्य), प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक मोहनजी बिसनारीया साहेब (कें. प्र. वाण्याविहीर), नरेश पाडवी (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), पुनमताई सैंदाने (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), सुनिल पाडवी (शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापन समिती)
तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील मान्यवर, पालक, नवीन प्रवेशासाठी नोंदणी झालेली बालकं, अंगणवाडी ताई, स्वयंसेवक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

ढोल, ताशे व मुलांच्या घोषणांच्या आवाजाने गावाकडे प्रस्थान केले नी गाव दुमदुमून निघाला. संपूर्ण गावात फिरून जनजागृती केली. यावेळी मुख्याध्यापक बालाजी केंद्रे यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी दाखलपात्र बालकांना व पालकांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. शाळेत पोचल्यावर वाण्याविहीर केंद्राचे केंद्र प्रमुख मोहनजी बिसनारीया साहेबानी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. मेळावा आयोजनाची गरज, महत्व व अंमलबजावणी कशी करावी? शाळापूर्व शिक्षण म्हणजे काय? काळाबरोबर बदलून प्रवाहात टिकण्यासाठी जाणीवपूर्वक मुलांना शिक्षण देण्याची गरज असल्याचे साहेबांनी विषद केले.


 


बैठक व्यवस्था सुव्यवस्थित होती. शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी एकूण ७ टेबलांवर साहित्याची मांडणी कार्यक्रमापूर्वीच केलेली होती. प्राथमिक माहिती व नाव नोंदणी,  शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांसाठी मार्गदर्शन व साहित्य वाटप यानंतर नियोजनाप्रमाणे मेळाव्यात मांडणी केलेल्या प्रत्येक टेबलांवरील साहित्याप्रमाणे एकूण २० प्रवेशपात्र मुलांची क्षमता चाचणी घेण्यात आली.





विशेष म्हणजे जि प सदस्या यांच्या नातवाला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याचे अनुमोदन दिले व नाव नोंदणी केली. कार्यक्रम अधिक सुंदर करण्यासाठी नियोजनात शाळेतील शिक्षकवृंद, अंगणवाडी ताई, त्यांच्या सहकारी, स्वयंसेवक यांच सहकार्य मोलाचं लाभले.



Post a Comment

0 Comments

झाले