उन्हाळी सुट्टीबाबत व शाळा सुरु करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय






✍गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072









नंदुरबार प्रतिनिधी:- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी मिळणार कि नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. परंतु आज दि. 1 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय काढून उन्हाळी सुट्ट्या किती दिवस? व शाळा परत कधी सुरु होणार ? या संदर्भात सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. 


यातील सुचना👇

1. उन्हाळी सुट्टी दि. 02 मे 2022 ते 12 जून 2022 या कालावधीत असणार आहे. 

2. दि. 13 जून 2022 पासून नियमित शाळा सुरू होणार 

3. विदर्भात 27 जून 2022 पासून शाळा सुरू होतील. विदर्भात उन्हाची तीव्रता लक्षात घेत उशिरा शाळा सुरु होतील. 

4. दिवाळीच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करून त्या गणेश उत्सव किंवा नाताळच्या वेळी देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.


सदरील शासन निर्णय खालील प्रमाणे आहे. त्यात आपण सविस्तर माहिती वाचू शकता.

शासन परिपत्रक

१) शासन परीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६,दिनांक २४ मार्च,२०२२.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे यांचे दिनांक ३१ मार्च,२०२२ चे पत्र.


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता १ ली ते ९ वी व इयत्ता ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन
२०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती.


  • १) सोमवार दि.०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

  • २) इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.

  • ३) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

  • ४) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

  • ५) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.

Post a Comment

0 Comments

झाले