एकलव्य संघटनेची भडगाव जि. जळगाव येथे तालुका बैठक संपन्न






✍️मा. भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना

जळगांव प्रतिनिधी:- एकलव्य संघटना भडगाव जिल्हा जळगाव आज दिनांक 03/04/2022 वार रविवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री. सुधाकर वाघ साहेब यांच्या आदेशानुसार व एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष जळगाव लोकसभा मा. संजय सोनवणे व युवा जिल्हाध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भडगाव येथे तालुका बैठक संपन्न झाली. 





दिनांक 11/04/2022 वार सोमवार रोजी धरणगाव येथे आदिवासी क्रांतिवीर खाज्यासिंग भिल्ल बलिदान दिना निमित्त समाधी स्थळ अभिवादन सभा ह्या संदर्भात आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता यांना एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष मा.संजय सोनवणे व युवा जिल्हाध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले भडगाव तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने आदिवासी भिल समाज बांधवांनी महाअभिवादन सभेला उपस्थित रहावे असं आवाहन करण्यात आले.





तसेच संघटनेत नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. जळगाव जिल्हासचिव पदी मा.दादाभाऊ बहिरम, मा.रवी जाधव बांबरुड, मा.रोहिदास सोनवणे अंजनविहीरे, मा.शांताराम सोनवणे बोदेड, मा.नाना मालचे वडजी, मा.मिथुन गायकवाड वडजी, मा.शांताराम सोनवणे पाथर्डी, मा.गोरख मोरे वाघ, मा.पिंटू मोरे वाघ, मा. ज्ञानेश्वर बोरसे पिचडे, मा.दत्तू मोरे गिरड, मा.गोकुळ बोरसे वाडे, मा.संतोष भिल्ल वाडे, मा.योगेश भिल्ल पिपरखेड, मा.दिलीप भिल्ल पिपरखेड सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. 





यावेळी एकलव्य संघटना भडगाव तालुका अध्यक्ष मा.दशरथ मोरे, शहराध्यक्ष भडगाव मा.विनोद मोरे, युवा तालुकाध्यक्ष मा.किरण मोरे, मीडिया प्रमुख मा.कृष्णा मालचे, मा.अविनाश गांगुर्डे, मा.संदीप वाघ, मा.राहुल सोनवणे, मा.वाल्मीक फुलजिरे, मा.विष्णू मोरे, मा उमेश गायकवाड, मा.विजू मालचे प्रमुख पदाधिकारी तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले