नंदुरबार दि.२०... शहादा तालुक्यातील जि.प शाळा घोडलेपाडा येथे शाळापूर्व तयारी अभियान उत्साहात पार पाडले.
चला चला शाळेला जाऊ, घरी कोणी नका राहू.
ताई माई आक्का, शाळापूर्व तयारीचा विचार करा पक्का.
शिक्षण शिक्षण कशासाठी, आपल्या सर्वांच्या भल्यासाठी.
प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी न राहिल.
अशा अनेक प्रेरक घोषणांच्या निनादात शाळापूर्व तयारी मेळाव्या निमित्त सकाळी प्रभातफेरी, जनजागृती फेरी निघाली. उत्साही मुल प्रभातफेरीची सूचना गावकऱ्यांना देत होती. दुघेरी रांगेत पुढे मुले मागे मुली, चारही बाजूने शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशावर्कर ताई, ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. बडगुजर सर यांनी माईकच्या माध्यमातून स्पिकरमधून मोठ्या आवाजात घोषणा देत होते. लग्नातील उत्साही कार्यकर्त्या प्रमाणे प्रत्येक चौकात, शालेय गितावर सर्वांचे पाय थिरकत होते, झिंगाट होत होते.अशाप्रकारे दिडतास प्रभातफेरी चालली.
जसा उत्साह, जोश ज्याप्रमाणे राष्ट्रीय सणांना असतो, त्याचप्रमाणे जोश आम्हा चौघांमध्ये संचारला होता. सर्वात अगोदर साफसफाई, सजावट, टेबल मांडणी, टेबलांचे नामकरण, टेबलावरील साहित्याची मांडणी निवड. सूचना फलक लावणे, वजनकाटा, उंचीमापण टेबल ठेवणे अशा कामांमध्ये जवळपास पाऊण तास गेला.
प्रभातफेरी नंतर मेळाव्याची सुरुवात झाली. प्रथम टेबलावर नावनोंदणीने आरंभ होऊन माता आपल्या बालकास घेऊन आता अश्यापद्धतीने शाळेत नाव दाखल होते या नवलाईने पुढे पुढे जात होती. सात फेऱ्या नंतर आज सात टेबले पार केल्यानंतर मुुले या निकषापर्यंत आली की मला स्मार्ट माता बनायचे आहे. दिडतासात जवळपास पंधरा मातांनी व बालकांनी यात सहभाग नोंदवला. शेवटच्या मनोगत, आभार श्री. रविंद्र बडगुजर यांंनी केले.व समारोप करण्यात आला.
हा सर्व कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी श्री. डि. टी. वळवी साहेब, केंद्रप्रमुख श्री. एल्. पी. परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक श्री. राजू जंगू पावरा सरांच्या सूचनांनुसार श्रीमती यमुना चव्हाण मॅडम, श्री. रविंद्र बडगुजर सर व श्री. वसंत पावरा सर, शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व अंगणवाडी सेविका ताई, आरोग्य सेविका ताई, आशावर्कर ताई, पालक, गावकरी यांच्या सहकार्याने आनंदात पार पडला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार