याहामोगी धाम चिखली ता.नवापूर येथे आदिवासी रूढीपरंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांच्या मार्फत लग्न गीत स्पर्धा संपन्न .

याहामोगी धाम चिखली ता.नवापूर येथे आदिवासी रूढीपरंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांच्या मार्फत लग्न गीत स्पर्धा संपन्न .  नंदुरबार दि.२९. स्पर्धाची सुरवात प्रथम प्रार्थना म्हणुन व अध्यक्ष निवड करून अध्यक्ष श्री .संजयभाई वळवी ( चिखली याहामोगी धाम अध्यक्ष ) प्रमुख पाहुणे श्री. दयारामभाई वसावा ( चिखली याहामोगी धाम सचिव ) श्री.अरविंद वळवी ( मा.उपायुक्त ) बिलदा व श्री.राजेंद्रजी गावीत ( देवमोगरा शिक्षण संस्था अध्यक्ष ) हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते याहामोगी मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन व सामुहिक आरती म्हणुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.अध्यक्ष व प्रमुख पाहुणेचे संस्थे तर्फे स्वागत करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.बाबुराव वसावे यांनी केले व स्पर्धेला सुरुवात करण्यात आले. स्पर्धेसाठी २२ गावातील २०० पेक्षा जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम बक्षिस ५००० रुपये सावरट ता. नवापूर तर दुसरे बक्षिस ३००० रु . पेथापुर ता . उच्छल जि.तापी तिसरे बक्षिस २००० रु जामनपाडा ता.नवापुर चौथे बक्षिस १००० रु . वराडीपाडा ता.नवापुर यांना मिळाले. सदर कार्यक्रम करण्यासाठी श्री. डी.डी. वळवी ( निवृत. जिल्हाधिकारी ) श्री.भरत माणिकरावजी गावीत ( तालुका अध्यक्ष भाजपा ) श्री . राजेंद्रजी गावीत ( देवमोगरा शिक्षण संस्था अध्यक्ष ) आमदार श्री. शिरीषकुमारजी नाईक नवापुर श्री . मनिष अग्रवाला चिंचपाडा , श्री. सुरेश गावीत ( मा.पं. स . सदस्य नवापुर ) श्री.अनिल गावीत ( तहसिलदार चोपडा ) श्री . विलास पाडवी ( उपायुक्त अमरावती ) श्री. किरण वळवी ( अध्यक्ष अनु . आश्रमशाळा वडफळी ) श्री . कमलशेठ विसरवाडी , श्री.सचिन अग्रवाल विसरवाडी ,. मंदा मॅडम ( उप . प्रार्चाय नवापुर ) श्री.दिपक वळवी ( पी.आय. नाशिक ) श्री.आतऱ्या पाच्या वळवी ( मा.सरपंच चिखली ) श्री. राजुदादा गावीत ( सावरट ) श्री. परतान गावीत ( जामनपाडा ) श्री. रविंद्रभाई ( करोड ) ओम डिजीटल फोटो स्टुडियो विसरवाडी , श्री. राज गावीत ( बोरपाडा ) यांनी कार्यक्रमासाठी बहुमोल असे सहकार्य केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.जिवन गावीत व श्री.अशोक पाडवी यांनी केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन श्री. गुलाबसिंग वसावे ( सावरट ) श्री. रामुभाई वसावा ( मांडळ ) श्री. देवराम गुरुजी ( वडगाव ) श्री . विलेसभाई ( पेथापुर ) श्री. प्रेमल पाडवी ( चिंचपाडा ) यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावीत यांनी लग्नाचे महत्व आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. तर श्री.अबेसिंग गावीत यांनी कार्यक्रामाचे उद्देश काय आहे याची माहिती दिली. श्री.अरविंद वळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्वाचे आभार श्री.किशोर वसावे यांनी मानले . व कार्यक्रमाची सांगता करण्यात आले .

Post a Comment

0 Comments

झाले