भारतीय बौध्द महासभा मालेगाव शहर कार्यकारिणी जाहीर व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम संपन्न



 

✍️आयु. सतिष भाऊ मगरे मालेगाव शहर सरचिटणीस भारतीय बौध्द महासभा

मालेगाव:- दि.१५/०४/२०२२ शुक्रवार रोजी भारतीय बौध्द महासभा ( Bhartiy Baudhh Mahasabha ) नाशिक जिल्हा पूर्व विभागांतर्गत मालेगाव शहर शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक वाटप कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आयु. गौरव पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्वर प्रज्ञासूर्य बुद्धविहार मालेगाव येथे आयोजित करण्यात आला.



सर्व प्रथम आयु. गौरव पवार गुरुजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते तथागत भगवान बुध्दांना पुष्प अर्पण करण्यात आले व आयु. वाल्मिक कापडे कार्या.सचिव यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित जिल्हा सरचिटणीस आयु. सतीश गांगुर्डे यांच्या हस्ते दिपप्रवजन करण्यात आले. मालेगाव शहरध्यक्ष आयु. आनंद मैराळे याच्या हस्ते धूप पुजा घेण्यात आली. व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.




नवनियुक्त शहर शाखे तर्फे जिल्हा पदाधिकारी यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम जिल्हा कार्यालयीन सचिव आयु. वाल्मिक कापडे गुरुजी व आयु. वाल्मिकी देवरे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. तदनंतर जिल्हाध्यक्ष गौरव पवार गुरुजी यांनी नवनियुक्त मालेगाव शहर शाखेच्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक व मार्गदर्शन केले.


यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शनात सांगितले की, आज आपल्या पुढे खूप मोठे आव्हान आहे. समाजाची बदलती स्थिती व कालच आपण बघितलेली समाजाची अवस्था याकडे संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना लक्ष द्यावे लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 एप्रिल 1953 साली आपल्या जन्म दिनी शुभेच्छा देण्यास आलेल्या उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, राज्यकर्त्यांचे डाव हाणून पाडायचे झाल्यास सर्वांनी आपले मतभेद विसरून सुसंघटित  व्हायला पाहिजे. आपली ताकत पणाला लावून आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवीला पाहिजे. डॉ. बाबासाहेब नेहमी सांगतात की, "हजारो बाजार बुणग्यांचे सैनिक असण्यापेक्षा मला दहाच शिस्तीचे प्रामाणिक सैनिक असले तरी बस्स " आज ही समाजात ही परिस्थिती लागू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नुसते नाव घेऊन किंवा जयजयकार करून धम्मक्रांती होणार नसून तुम्हा आम्हाला समाजात बौद्ध धम्माचे संस्कार रुजवावे लागतील. येणाऱ्या काळात आमचा असलेला शत्रू खूप बलवान रुपी समोर असून आम्हाला नियोजन बद्ध कार्य करावे लागेल. एका दिवसाने भावुक होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित कार्य होऊ नाही शकत तर आम्हाला धम्म कार्यात इमानाने व निष्ठेने उभे रहावे लागेल. 


यावेळी अनेक जुन्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यातआला. व सांगितले की भारतीय बौद्ध महासभा ही बौद्ध अनुयायी यांची एकमेव मातृ संस्था आहे. आपण सर्व या राष्टीय संस्थेच्या कार्यास मालेगाव शहराच्या घरा घरात घेऊन जावे असे जिल्हाध्यक्ष आयु.गौरव पवार गुरुजी यांनी सांगीतले. व नवनियुक्त शाखेस पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष आयु. गौरव पवार गुरुजी यांनी मालेगाव शहर शाखा चे संपूर्ण कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर केली व त्यांना नियुक्ती पत्रक दिले.

  1. शहरध्यक्ष-आयु. आनंद भीमराव मैराळे
  2. शहर सरचिटणीस आयु. सतिष बाबुलाल मगरे 
  3. कोषाध्यक्ष आयु. दादाजी काशिनाथ वाघ
  4. शहर संस्कार उपाध्यक्ष आयु. वाल्मीक तुकाराम देवरे
  5. शहर महिला उपाध्यक्ष सौ. नलिनी ताई गायकवाड
  6. शहर महिला सचिव सौ. उज्वला यशवंत मगरे
  7. शहर महिला सचिव सौ. वर्षा संजय आहिरे
  8. शहर प्रयटन प्रचार आयु. नितीन बागुल
  9. शहर संरक्षक उपाध्यक्ष आयु. दिपक उत्तम यशोद
  10. शहर संस्कार सचिव आयु. माणिक कटारे
  11. शहर संस्कार सचिव आयु. मंगेश फकिरा निकम
  12. शहर प्रयटन प्रचार आयु. अनिल महिरे
  13. शहर प्रयटन सचिव आयु. संदीप गायकवाड.
  14. शहर संरक्षण सचिव आयु. दिपक जयराम उशिरे
  15. शहर संरक्षण सचिव आयु. सुभाष सिद्धार्थ पटाईत
  16. शहर संघटक आयु. प्रदीप पवार
  17. शहर संघटक आयु. अशोक बाबुराव धिवरे
  18. शहर संघटक आयु. संदीप मगरे


बैठकीची प्रस्तावना जिल्हा सरचिटणीस आयु. सतीश गांगुर्डे यांनी केली व आभार शहर अध्यक्ष आंनद मैराळे यांनी केले. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले