नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अंबापुर येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.प्रथम दवंडी देण्यात आली तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या घरी भेट देण्यात आली.दुसऱ्या दिवशी दाखलपात्र, प्रभातफेरी काढून नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.गोबऱ्यादादा पवार आणि उपाध्यक्ष श्री. भरत बागुल यांनी कार्यक्रमाचे उद्घघाटन केले. सरस्वती पुुजन करून मेळाव्यास सर्वात झाली असता दाखलपात्र विद्यार्थ्यांची प्रत्येक टेबलवर शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, गणनपूर्व तयारी इ.तपासणी करून नाव नोंदनी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक रमेश पवार, शिक्षक भागवत धनगर, देविदास कोकणी, दातक्या वळवी, सपना हिरे, अंगणवाडी सेविका सीता चौरे, रंगू चौरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी देविदास कोकणी यांनी फलक लेखन केले. भागवत धनगर यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार सपना हिरे यांनी मानले.साहित्य मांडणी दातक्या वळवी यांनी केली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार