धडगाव तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा-चिखलटीपाडा शाळापूर्व तयारी अभियान उत्साहात संपन्न




  


✍गोपाल गावित सर ( Gopal Gavit ), जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 
मो.नं. 9527722072
गोपाल गावित सर









नंंदुुरबार दि. 20 धडगाव तालुक्यातील जि.प चिखलटीपाडा शाळेेत पहिला मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे आकर्षण म्हणजे प्रवेशपात्र मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी, महिला वर्गांनी, सर्व गावातील ग्रामस्थांनी ढोलाच्या तालावर सुंदर नृत्य केले. या मेळाव्यातून इ. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पूर्व तयारीसाठी विविध क्षमता विकसन चाचपणीसाठी या मेळाव्यात जनजागृती रॅली, विविध खेळ माध्यमातून नाव नोंदणी करणे, वजन, उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणन पूर्व तयारी व पालकांना मार्गदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात आले. नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांची स्वागत केले गेले. त्यांच्याकडून विविध प्रात्यक्षिके करून घेण्यात आले.




यासाठी गावातील माध्यमिक, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या मेळाव्यासाठी गावातील शा.व्या.समिती अध्यक्ष मोका पावरा, पोलिस पाटील मेरसिंग पावरा,शिक्षणप्रेमी दिनेश पावरा,सर्व सदस्य, मुख्याध्यापक-विजय कामडे,सहकारी शिक्षक विशाल कोकणी,अंगणवाडी सेविका वशीबाई पावरा, मदतनिस, स्वयंसेवक, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्व पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 


मुख्याध्यापक विजय कामडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, सहशिक्षक विशाल कोकणी सरांनी शाळापूर्व तयारी उपक्रमाची माहिती सर्व उपस्थित पालकांना दिली. शाळापूर्व तयारी मेळावा उपक्रम उत्साहात साजरा झाला. शेवटी मुख्याध्यापक विजय कामडे यांनी आभार मानले, व कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments

झाले