विश्वरत्न, विश्वविख्यात कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्सव सोहळा अजमीर सौंदाणे येथे संपन्न






सटाना प्रतिनिधी:- आज विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) १३१ वी जयंती उत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाला सदर कार्यक्रमास सकाळी नऊ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथुन सुरवात करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मगन धिवरे, चंद्रकांत धिवरे, वसंत धिवरे, सरपंच धनंजय पवार उपसरपंच दिपक शेवाळे, पोलिस पाटील रणजितसिंह पवार, अजमीर सौंदाणेचे दानशूर व्यक्तीमहत्व खुशाल आबा पवार, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटोळे, भुषण पवार, भावडु मगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रमास सुरुवात आली.

 


बुद्धवंदना झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवणावर निलेश देवरे यांनी विचार मांडले व त्यांच्या नंतर पहीलीच्या वर्गात शिकणारी लहानशी चिमकुली भुषण जगताप यांची कन्या कु.चैताली हिने बाबासाहेबांन बद्दल तिचे विचार मांडले सदर कार्यक्रमात उपस्थिती असणारे यशवंत धिवरे, चिंतामण धिवरे, दिलीप धिवरे, मनीराम धिवरे, तानाजी धिवरे, राजाराम जगताप, तानाजी धिवरे, सुपडु केदारे, पंकज धिवरे, संदीप दादाजी धिवरे, गौतम धिवरे, शरद सरदार, जालींदर काकळीज, मच्छिंद्र काकळीज, गणेश धिवरे, सुनील धिवरे, राजेंद्र धिवरे, संदीप मनीराम धिवरे, गोरख धिवरे, विकास धिवरे, सागर जगताप, सुपडु वाकळे, अविनाश अहीरे, बाबाजी सोनवणे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.  



जयंती ऊत्सवाचा पुढील कार्यक्रम हा ग्रामपंचायत अजमिर सौदांणे येथे साजरा करण्यात आला, ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच धनंजय पवार यांनी विचार मांडले व त्यांनतर वसंत धिवरे यांनीही विचार मांडले, त्यांनतर पंकज धिवरे, शरद सरदार व भाऊसाहेब ठोके यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments

झाले