यवतमाळ मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा साकोलीत सत्कार

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)


✍️एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

साकोली प्रतिनिधी:- साकोली वरून बदलून गेलेले सध्या  यवतमाळ नगरपरिषद मध्ये उपायुक्त पदावर असलेल्या माधुरी मडावी नुकतेच साकोली ला येऊन गेले यांनी धावती भेट दिली त्या भेटी दरम्यान साकोली येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माधुरी मडावी यांना राज्यपाल तर्फे कमला पावर वुमन अवॉर्ड तसेच पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक हिरकणी पुरस्कार, तसेच पोलीस टाईम पुणे तर्फे सक्षम महिला रत्न पुरस्कार मिळाला या सर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल साकोली येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माधुरी मडावी यांच्या यांच्या स्वतः त्यांनी बनवलेल्या मनोहरभाई पटेल कॉलेजच्या कालेज रोडच्या गार्डन येथे  त्यांचा सत्कार करण्यात आला. 


त्याचप्रमाणे माधुरी मडावी यांनी नगरपरिषद, पटाच्या जागेवर असलेला सकस आहार केंद्र ठीक-ठिकाणी भेटी दिल्या व सामाजिक व इतर विषयावर चर्चा झाली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे, पत्रकार व डी जी रंगारी, उमेश कठाणे, चंदू वडीचार, ओम गायकवाड, नगरसेवक मीना लांजेवार, सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. 


भेट झाल्यानंतर लगेच माधुरी मडावी मॅडम यवतमाळला रवाना झाल्या भेटीदरम्यान सर्वांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एक सक्षम अधिकारी आपल्या गावी भेट देऊन आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेट दिल्याबद्दल सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.



Post a Comment

0 Comments

झाले