बिरसा क्रांती दल शिरपूर तालुका महिला अध्यक्षपदी आदि. सुनिता तारसिंग पावरा यांची निवड





✍मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

धुळे जिल्हा :- बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी ( Adivasi ) समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने ( Birsa Kranti Dal ) घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबना स्विकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.




या संघटनेच्या शिरपूर ( Shirpur ) तालुका महिला अध्यक्ष पदी आदि. सुनिताताई पावरा यांची निवड दि.१४-०४-२०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दशरथ मडावी साहेब ( Dashrath Madavi ) यांच्या आदेशानुसार ऑनलाईन मिटिंगद्वारे करण्यात आली. 


यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री डी बी अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री चिंधू आढळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री विजय आढारी, महाराष्ट्र राज्य महिला फोरम अध्यक्षा गिरिजा ताई उईके, नाशिक जिल्हा अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष मा. अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मा. भगवान देशमुख, मा. मधुकर पाडवी, जिल्हा महासचिव मा. किशोर माळी, नांदगाव तालुका अध्यक्ष मा.हिरालाल देशमुख, दिंडोरी तालुका महिला अध्यक्षा कविताताई भोंडवे, नाशिक तालुका अध्यक्ष मा. पुंडलिक पिंपळके सर इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले