आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)
✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल मो-9307691872
चंद्रपूर जिल्हा-दि.२२एप्रिल- अंगप्रदर्शन अश्लील व्हिडिओ द्वारे आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर सायबर क्राईम व ॲट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर, (तालुका ब्रम्हपुरी) वतीने पोलिस निरीक्षक साहेब ब्रम्हापुरी तालुका पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की अभिनेत्री राखी सावंत यांनी आदिवासी समाजाला उद्देशुन अश्लील अंगप्रदर्शनाची कृती करत व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्राम व व्हाटस्अॅप अशा सोशल मीडियावर टाकून संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी केली आहे व आदिवासी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ, संताप निर्माण होईल यासाठी आक्षेपार्ह वाईट कृती केली आहे. राखी सावंतांच्या या वाईट कृत्याचा आम्ही बिरसा क्रांती दल ब्रम्हापुरी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो राखी सावंत यांनी "मेरा ये लुक देख रहे हैं, आज पुरा ट्रायबल लूक, आदिवासी आदिवासी इसको कहते हैं, हम तो लुकस हैं और ये देखिये भुम भुम टरारा भुम भुम!" असं अश्लील शब्दात अश्लील शारीरिक कृतीतून आदिवासी समाजाला बदनाम केले आहे. आदिवासी समाज शांतताप्रिय व प्रामाणिक आहे. या शांतताप्रिय समाजाला अश्लील व्हिडिओ द्वारे जाणीवपूर्वक भडकावणयाचे काम राखी सावंत यांनी केले आहे.
स्त्रीयांची लाज, लज्जा, मर्यादा तोडून अश्लील कृती द्वारे स्त्री जातीला सुध्दा कलंकित केले आहे. राखी सावंत यांच्या या सोशल मीडियावरील अश्लील व्हिडिओमुळे आदिवासी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. व राखी सावंत बद्दल आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राखी सावंतच्या विरोधात देशभर आदिवासी संघटनांकडून निषेध नोंदविला जात असून फौजदारी कारवाईसाठी मागणी केली जात आहे. तरी अंगप्रदर्शनाच्या अश्लील कृतीतून जाणीव पूर्वक आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या आदिवासी समाजात तेढ, प्रचंड संताप निर्माण करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर सायबर क्राईम व ॲट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.
निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष मा.दिलीप कोडापे सर, ब्रम्हापुरी तालुका अध्यक्ष मा.अमित कनाके, सौ वंदना मडावी महिला फोरम अध्यक्षा ब्रम्हापुरी, मा.सुधाकर कोल्हे जिल्हा सचिव, तेजस्वी सुरपाम तालुका उपाध्यक्ष, पायल कुलसंगे तालुका सचिव, अलका पेंदाम तालुका संघटक, सदस्य सौ. उईके मॅडम, सौ.सिराम मॅडम इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार