✍️निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
बुलढाणा प्रतिनिधी:- आदिवासी जमातीतील भिल्ल प्रवर्गातून बुलडाणा जिल्ह्यातून प्रथमच B.S.F. मध्ये कु.मोनिका पिपळे ( Monika Pimple ) यांची निवड. शहरात वाास्तव्य करत असलेल्या कु. मोनिका पिंपळे आदिवासी जमातीपैकी भिल्ल जमातीच्या आदिवासी समाजातून शिक्षण घेत असलेली मोनिका पिंपळे हिने गाठले देशाचे सरहद्दीचे रक्षण करण्याचे ध्येय आदिवासी समाजातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला मात करत तिने तिचे आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
तिला बुलडाणा जिल्ह्यातील पहिली आदिवासी महिला भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्याचा मान मिळाला आहे. कुमारी मोनिका पिंपळे हिची मागील वर्षी B.S.F. मध्ये निवड झाली आहे. हिने मागील वर्षी ११ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून घरी परतली. मोनिका पिंपळे हिने जिल्ह्यातील आदिवासी मुलींना प्रोत्साहन मिळेल अशी कामगिरी करून दाखवली आहे.
एकलव्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी मोनिका पिंपळे हिचा सत्कार केला. सत्कार करताना एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव मा.श्री. मधुकरजी पवार, एकलव्य संघटना बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विकी गायकवाड, सौ.सपना गायकवाड (महिला जिल्हा अध्यक्ष), मा.श्री.कैलास माळी (नगरसेवक बुलडाणा), श्री. विष्णू बरडे (बुलडाणा शहर अध्यक्ष), श्री. पिंटू विरे (तालुका अध्यक्ष), श्री.अनिल बरडे, श्री. किसना निकम, गजानन बरडे, श्री.शंकर विरे, श्री.सचिन गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार