गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून तथागतास त्रिवार अभिवादन..!*🙏🙏🙏*आज सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी दुपारी 12 : 00 वा.पाटलीपुत्र बुद्ध विहारसंविधान नगर सोयगाव (मालेगांव कॅम्प)ता. मालेगांव जिल्हा नाशिक येथे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध वंदना घेऊन तथागत बुद्धांना त्रिवार वंदन केले.व गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना परीवर्तन ग्रुप मालेगांव (नाशिक) यांचे तर्फे वैशाखी पौर्णिमा, बुद्ध जयंती निमित्ताचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून तथागतास अभिवादन करण्यात आले.* *सदर साहित्यात स्कूलबॅग व त्या बॅग मध्ये पेनबॉक्स, चित्रकला वही, पेन्सिलबॉक्स, कंपासपेटी, हासूरे इंग्लिश पुस्तक, निबंध पुस्तक, 200 पेजेस वह्या इत्यादी साहित्य गोरगरीब मुला, मुलींना वाटप केले.* *सदर कार्यक्रमास परिवर्तन टिमचे आयुष्यमती रंजना थोरात मॅडम,आयु.राजेश थोरात दादा, आयु. देवरे बापु दादा, आयु. हंसराज भालेराव सर आयु. केदार निकम सर,आयु. ॲड.रविंद्र देवरे सर आयु.दीपक उशिरे भाऊ ,आयु.विनोद जाधव सर , बौद्धाचार्य रमेश खरे गुरुजी व गोरगरीब विद्यार्थी उपस्थित होते.*😢🙏🌹आपले विनीत🌹🙏*परिवर्तन टीम सर्व सदस्य मालेगांव ता.मालेगाव जिल्हा नाशिक.*🌹🌹🌹🤝🌹🌹🌹🙏🙏🙏👍🙏🙏🙏

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार