सेवाज्येष्ठता यादीतील सेवानिवृत्त, मयत कर्मचाऱ्यांची नांवे वगळुन नवीन यादी प्रसिद्ध करावे. प्रहार शिक्षक संघटनेची सीईओ कडे मागणी

सेवाज्येष्ठता यादीतील सेवानिवृत्त, मयत कर्मचाऱ्यांची नांवे वगळुन नवीन यादी प्रसिद्ध करावे. प्रहार शिक्षक संघटनेची सीईओ कडे  मागणी          नंदुरबार दि.३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी मा. रघुनाथ गावडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद , नंदुरबार, मा.सतीश चौधरी साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , नंदुरबार, शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना. बच्चु कडू साहेब, प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे यांना ईमेल द्वारे निवेदन करण्यात आले आहे. विषय : - सेवा ज्येष्ठता यादीतील सेवानिवृत्त , मयत कर्मचाऱ्यांची नांवे वगळुन नवीन यादी प्रसिद्ध करणेबाबत संदर्भ : - शिक्षणाधिकारी ( प्राथ . ) जि.प.नंदुरबार यांचे पत्र जा.क्र.जिपनं / शिक्षण / आस्था -२ / सेवा - ज्येष्ठता / अंतिम / ४४ / २०२२ नंदुरबार दि .०२ / ०५ / २०२२ उपरोक्त विषयास अनुसरुन प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार शाखेच्यावतीने आपणांस नम्र निवेदन सादर करीत आहोत की , नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , शिक्षण विस्तार अधिकारी व दिव्यांग पदोन्नती मुख्याध्यापक यांच्या सेवाज्येष्ठता यादीतील बरचसे कर्मचारी हे सेवानिवृत्त , मयत झाले असून देखील मागील ०४ वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या सेवा ज्येष्ठता यादीतुन सेवानिवृत्त , मयत कर्मचाऱ्यांची नांवे वगळण्यात आलेली नाहीत . तरी जिल्हा परिषद , नंदुरबार अंतर्गत कार्यरत पदोन्नती मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , शिक्षण विस्तार अधिकारी व दिव्यांग पदोन्नती मुख्याध्यापक यांची सेवा ज्येष्ठता यादीतील सेवानिवृत्त, मयत  कर्मचाऱ्यांची नांवे वगळुन सदर सेवा ज्येष्ठता यादी नवीन प्रसिद्ध करणेस विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

झाले