औरंगाबाद प्रतिनिधी :- दि.12/05/2022 वार :- गुरुवार रोजी स्व.शिवनंदा शंकर मोरे या आदिवासी भिल समाजाच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करुन प्रेत विहिरीत फेकण्यात आला .या ताईस न्याय मिळवुण देण्यासाठी एकलव्य संघटनेतर्फे आदिवासी हृदयसम्राट मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला .हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन पोलीस स्टेशन वाळुज येथे काढण्यात आला.यावेळी मा.सुनिल ठाकरे साहेब (जि.अध्यक्ष औ.पुर्व. विभाग),मा.नंदुभाऊ पवार साहेब(जि.अध्यक्ष.औ.पच्छिम विभाग),मा.हिरालाल पवार साहेब(टा.ग्रृप.जि.अध्यक्ष.औ.),मा.नामदेव माळी साहेब (जि.उपाध्यक्ष टा.ग्रृप),मा.पिंटुभाऊ गायकवाड साहेब (कार्याध्यक्ष जळगाव),मा.नारायण बर्डे (ता.अध्यक्ष गंगापुर),मा.भिकन पवार (ता.अध्यक्ष कन्नड) ,मा.शिवनाथ भुजंग (ता.अध्यक्ष अनु.जाती,जमाती.),मा.मच्छिंद्र गायकवाड(ता.उपाध्याक्ष कन्नड) ,मा.मुरलीधर आहिरे (ता.संघटक),मा.सागर मोरे (शहर अध्यक्ष वाळुज),कानिफनाथ आहिरे (ता.उपाध्यक्ष टा.ग्रृप),मा.राजु ठाकरे (शहर प्रमुख कन्नड),मा.सुभाष सोनवणे (ता.संघटक कन्नड),मा.ज्ञानेश्वर सोनवणे (वि.सं.ता.अध्यक्ष कन्नड),मा.रघुनाथ पवार (ता.युवा सचिव कन्नड),.मा.राम पवार (सर्कल प्रमुख वाळुज) ,बंडु सोनवणे (सर्कल प्रमुख करंजखेडा),मा.नितीन सोनवणे,तसेच वाळुज व गंगापुर तालुक्यातुन आपल्या ताईस न्यायमिळवुन देण्यासाठी आदिवासी समाजबांधव व माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या.
या घटनेच्या संबंधित जे आराेपी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.या घटनेचा शोध घेण्यास विलंब करत असतील किंवा पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केला असता येणार्या काळात एकलव्य संघटनेच्या वतीने प्रशासन विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल व यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा एकलव्य संघटनेच्या वतीने देण्यात आला...

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार