भारतीय बौध्द महासभा**🌹संस्थापक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर**🌹विद्यमान अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर*🌹 राष्ट्रीय सल्लागार आद.बाळासाहेब आंबेडकर*🌹राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. भिमराव य. आंबेडकर**शाखा*: *नाशिक जिल्हा पूर्व*मालेगाव तालुका* मालेगाव शहर शाखा अंतर्गत*_________________________________दि.१६ /५ /२०२२ /वार. सोमवार.मालेगाव शहर शाखेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा आर्थात बुद्ध जयंती निमित्त श्रावस्ती बुद्धविहार मालेगाव कॅम्प दी.प्रकाश हाउसिंग सोसायटी येथे खीर दान वाटप करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.सर्व प्रथम आयु.गौरव पवार,गुरुजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते तथागत भगवान बुध्दांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले व आयु.आनंद मैराळे गुरूजी शहर अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित मालेगाव शहर शाखा कोषाध्यक्ष आयु. दादाजी वाघ गुरूजी यांच्या हस्ते धूप पुज्या दिपप्रवजन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आदर्शांना पुष्प अर्पण करण्यात आले.यावेळी सामूहिक त्रिशरण व पंचशील ,भिमस्मरण भीमस्तुती,परित्राण पाठ घेण्यात आले.तद्नंतर आयु.गौरव पवार, जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थितांना बुद्ध पौर्णिमा आर्थात बुद्ध जयंती आणि भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म च्या बाबतीत मार्गदर्शन केले लोक कल्याण्याचा मार्ग फक्त बौद्ध धम्म च आहे अशी माहिती दिली. मालेगाव शहर शाखा. अध्यक्ष आयु आनंद मैराळे गुरूजी.शहर सरचिटणीस आयु.सतिष मगरे.शहर कोषाध्यक्ष.आयु.दादाजी वाघ गुरूजी.सौरक्षन सचिव.आयु.दिपक उशिरे गुरूजी. सौरक्षन उपाध्यक्ष आयु. दिपक यशोद गुरूजी. सौरक्षन सचिव. आयु. सुभाष पटाईत आदि मान्यवर उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना मालेगाव शहर शाखा सरचिटणीस आयु.सतीश मगरे यांनी केली व आभार शहर अध्यक्ष आयु.आंनद मैराळे यांनी केले.. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी तसेच मालेगाव कॅम्प दि.प्रकाश हाउसिंग सोसायटी येथील आयु.किशोर आहिरे(सर) आयु.सिधार्थ पटाईत. उपासक उपासीका लहान मुले मुली मोठ्या संखे ने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरक्षन सचिव. आयु.दिपक उशिरे यांनी केले. 🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷आपलाच धम्म बांधव.आयु.सतिष बाबुलाल मगरे मालेगाव शहर शाखा सरचिटणीस

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार