भारतीय बौध्द महासभा
संस्थापक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar),
विद्यमान अध्यक्षा- महाउपासिका मिराताई आंबेडकर
राष्ट्रीय सल्लागार- आद. बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष- आद. भिमराव य. आंबेडकर
शाखा: नाशिक जिल्हा पूर्व मालेगाव तालुका मालेगाव शहर शाखा अंतर्गत
मालेगाव प्रतिनिधी:- दि.५.५.२०२२. वार गुरुवार रोजी मालेगाव शहर शाखेच्या वतीने प्रज्ञासूर्य बुद्धविहार संगमेश्वर मालेगाव येथे ममतासागर महाउपासिका वंचितांची आई आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर यांचा जन्म दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम आयु.गौरव पवार गुरुजी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते तथागत भगवान बुध्दांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले व आयु.वाल्मिक कापडे कार्या. सचिव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थित शहर शाखेचे मालेगाव शहरध्यक्ष आयु.आनंद मैराळे यांच्या हस्ते धूप पुजा करण्यात आली व कोषाध्यक्ष आयु.दादाजी वाघ गुरूजी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आदर्शांना पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी सामूहिक त्रिशरण व पंचशील, भिमस्मरण भीमस्तुती, परित्राण पाठ घेण्यात आले. जेष्ठ बौद्धचार्य आयु. वाल्मिक कापडे गुरुजी यांनी दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर ताई साहेबांनी कशा पध्दतीने संस्थेचे सर्व कार्य हाती घेतले व देशभरात संस्थेच्या कार्याला पोहचवले व लोक सहभाग वाढविला याची माहिती दिली व ताईंच्या पुढील आयुष्यासाठी याचना केली. तद्नंतर आयु. गौरव पवार, जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थितांना ताईंच्या कार्याची माहिती दिली व ताई एक महिला असून देशभरात प्रचार कार्य करू शकतात तर मंग आपण सर्व का नाही काम करू शकत आपण सर्वांनी ताईंचा आदर्श घेतला पाहिजे व लोक कल्याणाचा मार्ग बौद्ध धम्म लोकांमध्ये घेऊन गेले पाहिजे अशा प्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस आयु. सतिष गांगुर्डे गुरूजी, जिल्हा कार्यालय सचिव आयु. वाल्मीक कपडे ग्रुरुजी, जिल्हा संस्कार सचिव आयु. यशवंत निकम गुरूजी, तालुका अध्यक्ष आयु. रविन्द्र निकम, तालुका सरचिटणीस आयु. शंकर खरे गुरूजी, शहर अध्यक्ष आयु. आनंद मैराळे गुरूजी, शहर सरचिटणीस आयु. सतिष मगरे, शहर कोषाध्यक्ष आयु. दादाजी वाघ गुरूजी, संस्कार सचिव आयु. मंगेश निकम गुरूजी, आयु. भारत यशोद आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका अध्यक्ष रवींद्र निकम यांनी केले. बैठकीची प्रस्तावना मालेगाव शहर शाखा सरचिटणीस आयु. सतीश मगरे यांनी केली व आभार शहर अध्यक्ष आंनद मैराळे यांनी केले. यावेळी संस्थेचे अन्य पदाधिकारी तसेच संगमेश्वर येथील उपासक उपासीका उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार