✍️मा. भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना
जळगाव प्रतिनिधी:- एकलव्य संघटना 🚩🚩
आज दिनांक ०१ मे २०२२ वार रविवार रोजी चाळीसगांव जि. जळगांव येथे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष एकलव्य संघटना मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब प्रदेश कार्याध्यक्ष यांनी आज बांधकाम कामगार, वीटभट्टी, उसतोड कामगार, मच्छीमार कामगार तसेच मजुरी कामगार जे मजुरी काम करून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह चालवतात अशा सर्व मजुरी कामगार यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात आज चाळीसगांव येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती येणाऱ्या काळात मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकलव्य कामगार संघटना स्थापन करून कामगार मजुरांवर वेळोवेळी होणारे अन्याय अत्याचार ह्या सगळ्याना थांबता यावे व कामगार बांधवांना न्याय मिळाला ह्या साठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ह्या बैठकीला एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष जळगांव श्री.संजुबाबा सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष श्री.रवींद्र सोनवणे उपजिल्हाध्यक्ष श्री.सुरेश सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.पिंटू गायकवाड चाळीसगांव तालुकाध्यक्ष श्री. मोती पवार एकलव्य टायगर ग्रुप तालुकाध्यक्ष श्री. प्रविण मालचे तसेच सोबत एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी ह्यावेळी उपस्थित होते.*

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार