मसवाणीच्या आदिवासी बांधवांवर झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा -मालतीताई किन्नाके

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)




मसवाणीच्या आदिवासी बांधवांवर झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा -मालतीताई किन्नाके जिल्हाध्यक्षा बिरसा क्रांति दल गोंदिया


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल  मो-9307691872

       

गोंदिया:- सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा मसवाणी येथे संजय कवाडकर या समाजकंटकाने आदिवासी बांधवांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले, परंतु सदर इसमाला आदिवासी समाज बांधवांनी जाब विचारला असता त्याने जातीवाचक शिवीगाळ केेेली एवढ्यात न थाांबता सदर इसमाने आदिवासी (Adivasi) महिलांवर मिर्ची पावडर फेकले. परंतु मसवाणी येथील महिला पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार करायला गेल्या असता सहाय्यक पो.निरिक्षक व ठाणे अंमलदार यांनी महिलांना उलसुलट सवाल जवाब करून हाकलून लावले.



सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आमच्या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा क्रांति दलाने (Birsa Kranti Dal) पुढाकार घेत संबंधित आरोपीवर अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित आरोपीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मा.जिल्हाधिकारी गोंदिया व मा.पोलीस अधिक्षक गोंदिया यांना बिरसा क्रांति दलाच्या  जिल्हाध्यक्षा तिरू. मालतीताई किन्नाके जिल्हा उपाध्यक्षा तिरू. हेमलताताई आहाके, सचिव बिंदूताई कोडवते, जिल्हा महासचिव संगिता ताई पुसाम, डिलेश्वरीताई मरसकोल्हे, शालीनीताई पंधरे, तिरु.फागोजी फरदे संघटक, तिरु. प्रकाश येलने तथा बिरसा क्रांती दलाचे सदस्य उपस्थितित निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

झाले