मालेगाव प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडी नाशिकपूर्व यांच्यातर्फे आयोजित तातडीची बैठक जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा लॉन्स येथे संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी सभाध्यक्षांच्या परवानगीने तालुकाध्यक्ष व सूत्र संचालक शशिकांत पवार यांनी शोकप्रस्ताव मांडला त्यानुसार सभेत उपस्थित सर्व पदाधिकारी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगताना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभाध्यक्ष यांच्या परवानगीने सभेचे कामकाज सुरू झाले.
सभेत चर्चिले गेलेले विषय आणि त्यातून आपल्या परीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेवुन सभा संपन्न केली. यातील बैठकीच्या विषयानुसार नाशिकपूर्व जिल्हा विस्तारित कार्यकारणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे, महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला व मनमाड शहराच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपाध्यक्ष आनंद शिंगारे, गोरखराव चव्हाण सचिव राम बस्ते, रुपेश पटाईत, सहसचिव राजू धिवरे, जिल्हा प्रवक्ता यशवंत निकम, संघटक समाधान देवरे, जिल्हा सदस्य प्रा.राजेंद्र पवार, शहराध्यक्ष कैलास लोहार, तालुका कोषाध्यक्ष सिध्दार्थ उशिरे यांच्या हस्ते करण्यात आला.
मनमाड शहर अध्यक्षा आम्रपाली निकम जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंगारे, गोरखराव चव्हाण समाधान देवरे, यशवंत निकम, रुपेश पटाईत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात येणाऱ्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन करत येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या नाशिकपुर्वमधे जिल्हा प्रभारी म्हणून मा.डॉ. नितीन सोनवणे यांची नियुक्तीची माहिती देत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा नियोजित कार्यक्रम पार पाडल्यानंतर मा.सोनवनेसाहेबांना आपण आपल्या विभागात बैठकीस निमंत्रित करू त्यामुळे त्यांच्या बैठकीची सूचना येण्या अगोदर शहर/तालुका कार्यकारणीने आपल्या परीने तयारीला लागावे असे सांगून येणाऱ्या १० तारखेपर्यंत सभासद नोंदणी शाखा बांधणी करून पक्ष बळकट करून आपला कार्य अहवाल द्यावा असे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार जिल्हा महासचिव संजय जगताप यांनी मानून सभाअध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.
यावेळी जिल्हा पदाधिकारी यांच्यासोबत मालेगाव शहर महासचिव ओजेस्विनी पवार शहर उपाध्यक्ष शेख कादीर, निकिता गरुड, किशोर निकम,
सचिव दीपक उशिरे, शहर सहसचिव शेख अलीम, आकाश सुरवाडे, तालुका उपाध्यक्ष संतोष आहिरे, ज्ञानेश्वर सोनवणे, तालुका सहसचिव गौतम बोरसे, मनमाड शहर महासचिव कैलास गोसावी, संघटक मनीष गोरे, सदस्य निलेश निकम, चंदनपुरी शाखेचे अध्यक्ष भारत लोंढे, कैलास लोंढे, कलेक्टर पट्टा शाखा महासचिव सुरेखा चव्हाण, सुनीता हरळे, वंदना धानोरकर आदी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार