मेहकर- बिरसा क्रांती दल ता.शाखेच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संताजी काॅन्हेट मेहकर येथे संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये मा.दशरथ मडावी साहेब (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल) यांचे हस्ते ज्योती ताई करवते व महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरे, महिला फोरमचे राज्याध्यक्ष गिरिजा ताई उईके, जिल्हा अध्यक्ष भगवानराव कोकाटे उपस्थित होते.
ज्योतीताई करवते यांना मुळातच सामाजिक कार्याची आवड आहे. आपल्या समाजातील लोंकाच्या विचारात परिवर्तन झाले पाहीजेत, या करिता त्या सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या या कामात त्यांचे पती सुध्दा मदत करतात या निवडीमुळे बिरसा क्रांती दल महिला फोरमचे परिवर्तनाचे विचार बुलढाणा जिल्हातील आदिवासी माणसापर्यंत पोहचेल असा विश्वास व्ही.डी. कोवे राज्यसंघटक यांनी व्यक्त केला.
यावेळी नंदा ठाकरे यांची मेहकर ता.अध्यक्ष, उषा मागाडे उपाध्यक्ष, नंदा चवरे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मण खिल्लारे (बिरसा क्रांती दल ता.अध्यक्ष), दिपक तांबारे शहर अध्यक्ष, गजानन ढोके उपाध्यक्ष, के.एन. डाखोरे, संतोष कोकाटे, विलास डाखोरे सचिव, वैजनाथ चवरे संघटक, किशोर गायकवाड प्रसिध्दीप्रमुख, वासुदेव भोकरे, मानिक गिऱ्हे, राजु अंभोरे सदस्य तर ज्योती लेकुरवाळे, तुळसा गिऱ्हे, देवका खिल्लारे, संध्या डाखोरे, शकुंतला तिवाले, निकिता इंगळे, मिना शिंदे, सुमित्रा ढोके
मिरा अंभोरे, चित्रा खिल्लारे, उषा माघाडे, कविता झळके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी महिला वर्ग व पुरूष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार