वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा पूर्वचे जिल्हा संघटक समाधान भाऊ देवरे यांचा वाढदिवस साजरा

आज नामपूर येथील सामाजिक व राजकीय कार्याची बुलंद तोफ अन्याय आत्याचारावर बंड करून पेटणारे व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवुन देणारेआंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे 
राजगृहाचे निष्ठावंत व प्रामाणिक सेवक त्याचप्रमाणे नामपूर येथील मानवता प्रतिष्ठानचे संस्थापक व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक समाधान भाऊ देवरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
वाढदिवस साजरा करतांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गोरखराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक निलेश देवरे, अन्याय आत्याचार समितीचे तालुका उपाध्यक्ष हेंमत भाऊ सुर्यवंशी,बिरसा फायटर्सचे जिल्हा पदाधिकारी हिरालाल गायकवाड, नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ पवार व आदी मित्र परिवार उपस्थित होता वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक निलेश देवरे व जिल्हा उपाध्यक्ष गोरखराव चव्हाण यांनी समाधान भाऊ देवरे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची महती सांगितली व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व शेवटी समाधान भाऊ देवरे यांनी सर्व मित्र परिवारांचे आभार व्यक्त केले
 

Post a Comment

0 Comments

झाले