दिनांक 6 जुन रोजी अजमीर सौंदाणे येथील महादंडनायक भगवान विर एकलव्य नगर येथे अजमीर सौंदाणेचे सामाजिक कार्यकर्ते व बिरसा फायटर्सचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सचिन भाऊ सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सदर वाढदिवसाला नामपूर येथील माजी पोलीस अधिकारी मा.गोरखराव चव्हाण साहेब व नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरेही उपस्थित होते सुरवातीला सामाजिक कार्यकर्ते निलेश देवरे,गोरखराव चव्हाण आणि समाधान भाऊ देवरे यांनी सचिन भाऊ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची महती सांगितली व सचिन भाऊ सोनवणे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन गोरखराव चव्हाण व समाधान भाऊ देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.सदर वाढदिवसाला कृष्णा पवार,अशोक सोनवणे, नानाजी खैरणार, संजय धोडंगे ग्यानदेव माळी, रमेश माळी, पांडुरंग सोनवणे, सुरेश गायकवाड, राहुल माळी, समाधान माळी, पूर्वेश माळी, सोमनाथ अहिरे, भारत माळी तात्या माळी, अशोक पवार,गणेश मांडवडे महिला व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सचिन भाऊ सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार