नामपूर येथील मानवता प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा पूर्वचे जिल्ह संघटक ,समाज सेवक, सामाजिक कार्यकर्ते,एक शांत आणि संयमी व्यक्तीमत्व,व कुठलाही सामाजिक व राजकीय सपोर्ट नसतांना स्वताच्या परीवाराकडे कमी आणि गोरगरीब जनतेकडे जास्त लक्ष देऊन सामाजिक कार्यातुन आपली प्रतिमा उमटवली आहे.समाधान भाऊ देवरे यांचा वाढदिवस नामपूर शहरातील सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक व व्यावसायिक संघटनांनी विविध ठिकाणी विविध प्रकारे मोठ्या आनंदात व उत्साहात शाल व श्रीफळ देऊन समाधान भाऊ यांच्या सामाजिक कार्याची तळमळ त्याचप्रमाणे राजकीय व धार्मिक कार्याची महती अनेंकानी आपल्या भाषणातून सांगितली नामपूर शहरातील अनेक ठिकाणी केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला.व त्याचबरोबर महाराष्ट्रातुन अनेक त्याच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.त्यांनी सर्वोंचे आभार व्यक्त केले व वाढदिवसानिमित्त सर्वोंचे प्रेम आणि जिव्हाळा बघुन त्यांनी सांगितले कि मला असेच प्रेम व अशीच साथ असु द्या मी नेहमीच समाजसेवेसाठी तत्पर हजर राहील आणि सर्व सर्वोच मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार