आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
अमोल पवार मालेगाव उपजिल्हा प्रतिनिधी
सटाणा:- बागलाण तालुक्यातील आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेमार्फत तालुक्यातील जायखेडा, ब्राह्मणगाव व ठेंगोडा या तिन्ही गटात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आदिवासींसाठी आरक्षण सोडावे यासंदर्भात नोव्हेंबर महिन्यात मा.जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बागलाण यांना निवेदन देण्यात आले होते.
तसेच बागलाण तालुक्यातील ताहाराबाद, विरगाव व पठावे या तिन्ही गटात पेसा कायद्यांतर्गत समाविष्ट असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे तिन्ही गट आदिवासींसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावेत याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर सोमपूर, सचिव मा.मश्चिंद्र बोरसे सर, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, बिरसा फायटर्सचे सचिन सोनवणे, हिरालाल गायकवाड, निलेश भोये व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

1 Comments
Great work 💐💐💐💐💐💐
ReplyDeleteजय आदिवासी
जय जोहार